पाम तेलामुळे वाढत आहे Bad Cholesterol | ICMR नुसार या तेलामुळे होऊ शकतात हृदयासंबंधीत आजार

भारतीय जेवण हे तेलाशिवाय अपूर्ण आहे. भारतामधील सर्व प्रकारच्या जेवणामध्ये हमखास तेल आढळून येते. तेलामुळे जेवणाला जी एक वेगळी विशेष चव मिळते ती इतर कशाने मिळणे बऱ्याच वेळा शक्य होत नाही. आपल्या देशातील बरेच पदार्थ असे आहेत, जे तेला शिवाय बनू शकत नाही. जेवणाच्या प्रत्येक पाककृती मधील तेल हा मुख्य घटक झालेला आहे. चुकून जेवणामध्ये तेल नसेल तर त्या जेवणाची चव हवीहवीशी वाटत नाही.

काही व्यक्तीना जेवणावरून तेल खाण्याची सुद्धा सवय आहे. ज्याप्रमाणे चटणी लोणच यांच्यासोबत सर्रास तेल खाल्ल जात अगदी त्याचप्रमाणे बरेच व्यक्ती इतर खाद्यपदार्थांवर सुद्धा तेल टाकून खातात. साधारणपणे दैनंदिन घरामध्ये बनविण्यात येणाऱ्या भाजीवर तर्री म्हणजेच तेलाची लेयर नसेल तर नाराजी व्यक्त केल्या जाते. मात्र आहार तज्ञ तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरजेपेक्षा जास्त तेल खान आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरत.

तेलामध्ये अनेक प्रकार आहेत, खास करून स्वयंपाक घरात वापरण्यात येणाऱ्या तेलामध्ये. तेल कुठलंही असो आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन झाल तर शरीरामध्ये वाढणार खराब कोलेस्ट्रॉल टाळता येण शक्य नाही. पूर्वीपासूनच भारतामध्ये विविध प्रकारच खाद्य तेल वापरण्यात येत. शेंगदाणा, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन तेल भरवण्यासाठी वापरण्यात येणारे हे मुख्य घटक आहे. असे असले तरी दिवसेंदिवस देशामध्ये स्वस्त असलेले पाम तेल वापरण्यावर भर दिला जात आहे.

ICMR नुसार पाम तेल हे शरीरामध्ये खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूप झपाट्याने वाढवते. एका मर्यादेपेक्षा जास्त खराब कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये वाढल्यास हृदयासंबंधीत आजारांना निमंत्रण मिळते. पाम तेलाच्या अधिक वापरामुळे शरीरातील नसा ब्लॉक होऊन हृदयासंबंधीत अडचणींमध्ये वाढ होऊ शकते. बाजारामध्ये मिळणारे पाकीट बंद प्रकारातील सर्व खाद्यपदार्थ जवळपास पाम तेलाच्या मदतीनेच बनलेले असतात. चिप्स, बिस्किटे, विविध प्रकारचे नमकीन यात मुख्यत्वे पाम तेल सर्रास वापरले जाते. पाम तेल खरंच आरोग्यासाठी हानिकारक आहे का? जाणून घेऊया या लेखाच्या मदतीने.

पाम तेल कशापासून मिळते?

पाम तेल पाम नावाच्या वृक्षाला जी फळ येतात त्या फळापासून बनवण्यात येते. जगामध्ये सर्वाधिक जास्त पाम तेल निर्यात करणारा देश म्हणून इंडोनेशियाची ओळख आहे. पाम तेल इतर तेलांच्या तुलनेमध्ये स्वस्त मिळते. स्वस्त असल्यामुळे पाकीट बंद खाद्यपदार्थांसाठी जसे बिस्किट, नमकीन व इतरही अनेक खाद्यपदार्थांमध्ये सर्रास वापरले जाते.

पाम तेल मर्यादित स्वरूपामध्ये सेवन केल्यास आरोग्यास अपाय होण्याची शक्यता काही अंशी कमी होऊ शकते. असे असले तरी आहारामध्ये पाम तेलाचा गरजेपेक्षा जास्त समावेश शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास कारणीभूत ठरत असतो. या कारणामुळेच बऱ्याच देशांनी पाम तेलावर काही प्रमाणात नियम आखून निर्बंध घातलेले आहेत.

खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?

कोलेस्ट्रॉल हा रक्तामध्ये आढळणारा मेणासारखा एक चिकट पदार्थ आहे. कोलेस्ट्रॉलमध्ये दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे खराब कोलेस्ट्रॉल आणि दुसरा प्रकार म्हणजे चांगल कोलेस्ट्रॉल. वैद्यकीय भाषेमध्ये या दोन्ही कोलेस्ट्रॉलच्या प्रकारांना एचडीएल आणि एलडीएल अशा स्वरूपात ओळखल्या जात. पाम तेलाच्या अमर्यादित वापरामुळे हृदयाच्या नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल निर्माण होते.

पाम तेलामध्ये असणाऱ्या अपायकारी घटकामुळे हृदयासंबंधी तसेच इतरही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार होण्याची संभावना वाढते. बऱ्याच वेगवेगळ्या तेलांमध्ये भेसळ करण्यासाठीही पामत्याला चा प्रामुख्याने उपयोग होतो. मानवी शरीराला मर्यादे पलीकडे पाम तेल सहन होत नाही, परिणामी पाम तेलाचे जास्त सेवन झाल्यामुळे आजारांची जोखीम वाढत जाते.

पाम तेलामुळे हृदयाच्या आरोग्याला काय हानी पोहोचते?

द जर्णल ऑफ न्यूट्रिशन या पत्रिकेत प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार पाम तेल हे कोलेस्ट्रॉल वाढीसाठी सर्वात घातक तेलांपैकी एक मानल जात. पामतेला मध्ये असलेले सॅच्युरेटेड फॅट्स शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढीस कारणीभूत ठरतात. तसेच पाम तेलाचा शरीरामध्ये असलेल्या लिपिड्स वर सुद्धा खूप वाईट प्रभाव पडतो. यामुळे हृदयविकाराचा झटका अचानक येण्याची संभाव्यता अनेक पटीने वाढते असही अभ्यासामध्ये आढळून आल आहे.

खाण्यासाठी कोणते तेल वापरायला हवे?

तुम्हाला तुमचा शरीर निरोगी ठेवायच असेल व कुठल्याही रोगाला बळी पडायचे नसेल तर पाम तेल वापरू नका. स्वयंपाकासाठी किंवा तळण्यासाठी मोहरी तसेच सूर्यफूलचे तेल वापरणे अत्यंत चांगले आहे. खाण्याचे तेल काही आठवड्यांनी आदलून बदलून वापरणे चांगले असते.

एकाच प्रकारचे तेल सातत्याने खाणे सुद्धा योग्य नाही. कधी तिळाचे तर कधी शेंगदाण्याचे व काही वेळा करडईचे तेल वापरणे चांगले. वेगवेगळे आरोग्यदायी तेल वापरल्यास आरोग्यासाठी निर्माण होणारी जोखीम कमी करता येऊ शकते.

Disclaimer – वर दिलेली माहिती ही काही सामान्य स्त्रोतांवरून घेतलेली आहे. Pmjobyojna.com या माहितीची पूर्ण रीतीने पुष्टी करत नाही. या माहितीच्या माध्यमातून कुठल्याही गोष्टीचा दावा केला गेलेला नाही. स्वतःच्या सद विवेक बुद्धीने व डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घेणे कधीही चांगले.

Leave a Comment