BT Cotton Seed Production : बीटी कपाशीची निर्मिती एकाच वाणापासून, मग विशिष्ट वाणासाठी हट्ट का

बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे तसेच ब्रँडचे सर्व बीटी कापूस (bt cotton seed) बियाणे एकाच आई-वडिलांपासून बनलेले आहे. या प्रक्रियेला इंग्लिश मध्ये पॅरेटल लाईन असे म्हणतात. या सर्व बियाण्यांचा वाढीचा काळ सुद्धा सारखाच 140-150 यादरम्यानचा आहे. कुठली तरी भंपक जाहिरात बघून किंवा अनावश्यक सल्ल्यावरून शेतकऱ्यांनी ठराविक ब्रँडच्याच बीटी कापसाचा आग्रह धरणे योग्य नाही. हे आव्हान कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केलेले आहे.

यावर्षी मान्सून चांगला असणार अशा बातम्यांमुळे शेतकऱ्यांना पेरणीची चाहूल आनंदी बनवत आहे. आपल्या आवडीच्या खतांसाठी व बियाण्यांसाठी शेतकरी कृषी सेवा केंद्रांसमोर ताटकळतपणे रांगा लावत असतात. मगाशीच अकोला जिल्ह्यामध्ये एका कृषी सेवा केंद्र समोर बियाण्यांसाठी लागलेल्या रांगेमध्ये वाद निर्माण होऊन हाणामारीही झालेली आहे.

काही शेतकरी तर अगदी काळया बाजारांमधून 500 ते हजार रुपये शिल्लक देऊन त्यांना हवे असलेले बियाणे खरेदी करत आहे. मात्र या सर्व घटने मधून बनावट बियाण्याचा वाढता सुळसुळाट तसेच शेतकऱ्यांना पावती न मिळणे अशा रीतीने शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची खंत कृषी विभागाने व्यक्त केली.

भंपक जाहिरातींना भूलतात शेतकरी

कपाशीच्या बियाण्यांच्या कंपन्या विक्रीसाठी भंपकपणे जाहिरातींना वळण देत असतात. भंपक व आक्रमकपणे केलेल्या या जाहिरातींचा शेतकऱ्यांच्या खरेदीवर मोठा परिणाम बघायला मिळतो. एकाच प्रकारच्या मातृ बियाण्यांपासून सर्व बियाणे तयार होते हे मात्र शेतकरी विसरून जातात. कपाशीमध्ये जेवढे वेगवेगळे प्रकार आहेत हे जवळपास सर्व एकाच गुणधर्माचे असतात.

बऱ्याच वेळा कंपन्या त्यांच्या कंपनीची बियाणे इतर बियाण्यांच्या तुलनेत कसे लवकर येते असं दाखवतात. प्रत्यक्षात कुठल्याही कंपनीचे बियाणे 140 ते 150 दिवस संपूर्ण वाढीसाठी येते, या कालावधीच्या खाली कुठलेही बियाणे येत नाही. हे सर्व शेतकऱ्यांनी डोळसपणे समजून घेण्याची नितांत गरज आहे. आपली स्वतःची गरज बघूनच बियाण्यांची खरेदी करावी असे आव्हान सुद्धा राज्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केले.

वाढत्या गर्दीचा होतो कंपन्यांना बक्कळ फायदा

बाजारामध्ये काही कंपन्या वर्षभरापासूनच त्यांच्या कडे असलेल्या विविध बियाण्यांची जाहिरात करायला सुरुवात करतात. जास्त प्रमाणात जाहिरात बाजी करून बाजारात प्रत्यक्षात बियाण्यांचा कमी पुरवठा करतात. जाहिरातींना भुलून शेतकरी विशिष्ट बियाण्यांसाठी हट्ट करतात. कंपन्यांकडून बियाण्याच्या कृत्रिम रीतीने तयार केलेल्या कमी पुरवठ्यामुळे कृषी सेवा केंद्रांवर गर्दी वाढते.

बियाण्याचे शॉर्टेज असल्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास होतो की हे बियाणे खूप चांगले आहे व अशाप्रकारे कंपन्या या माध्यमातून बक्कळ नफा कमवतात. कृषी अधिकारी यांनी असे सांगितले की विनाकारण एखाद्या बियाण्यासाठी गर्दी करण्यापेक्षा प्रतीक्षा त्या बियाण्याची गरज आपल्याला आहे का हे बघूनच खरेदी करा.

यावर्षी राज्यातील कृषी विभागाने बियाण्यांच्या काळया बाजाराला तडा बसावी व शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी सेवा केंद्रांमध्ये कृषी सहाय्यक नेमले आहे. कृषी सहाय्यक असल्या शिवाय कृषी सेवा केंद्रांना बियाणे विकता येणार नाही अशी ताकीद कृषी विभागाने दिली आहे. तरी कृषी सहाय्यक उपस्थित झाले नाही तर शेतकऱ्यांना बियाणे मिळेल का असा प्रश्न सुद्धा ऐरणीवर येत आहे.

कृषी तज्ञांच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी सभोवतालचे पर्यावरणीय वातावरण बघून तसेच पाण्याची उपलब्धता, पाऊस, जमिनीचा पोत या सर्व गोष्टी लक्षात घेऊन बियाण्यांची लागवड करावी. ग्रामीण भागामध्ये शेतकरी बियाण्यांच्या बाबतीत एकमेकांचे अनुकरण करण्यात पटाईत असतात, एकमेकांचे अनुकरण न करता स्वतःची गरज पाणी हवामान हे सर्व बघूनच वाणांची लागवड
झाल्यास शेतकरी अधिक समृद्ध होऊ शकतो यात शंका नाही.

Disclaimer – आम्ही कुठल्याही प्रकारच्या बियाण्यांची शाश्वती करत नाही. वरील माहिती ही मिळालेल्या माहितीच्या आधारे घेण्यात आलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याने तसेच खरेदीदाराने त्यांच्या कृषी सल्लागाराच्या सहाय्याने बियाणे खरेदी करणे कधीही चांगले.

Leave a Comment