Cotton Variety For Farmers। या हंगामात ह्या 7 कापूस वाणांची करा लागवड आणि मिळवा भरघोस उत्पन्न

येणाऱ्या काही दिवसांमध्येच मान्सून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेल. मान्सूनची चाहूल लागताच शेतकरी कोणते पिक शेतात लावायचे याचा विचार करतो. चांगले उत्पन्न देणारे कपाशीचे वाण (Cotton variety) तसेच इतर पिकांचा प्रथम विचार केला जातो. मानसून सहज रीतीने प्रवेश करत नाही, मान्सून येण्यापूर्वी बरेच वेगवेगळे पर्यावरणीय संकेत देतो.

हवामान खात्याचा अंदाज तसेच वातावरणामधील बदल या सर्व गोष्टींवर मान्सून केव्हा आगमन करेल हे कळते. मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच सर्व शेतकरी सुखावून जातात. केरळमध्ये 28 मे ते 3 जून दरम्यान मान्सून येण्याची शक्यता वर्तवली आहे. 8 जूनच्या सुमारास महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होईल असं सांगितल जातय.

मान्सूनचं आगमन झाल्यावर खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात होईल. यावर्षी भरघोस कपाशीचे उत्पन्न येण्यासाठी कोणत्या कपाशीच्या जाती शेतकऱ्यांनी निवडायला हव्यात याविषयी आपण खाली माहिती बघणार आहोत. 7 Cotton variety जा शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न देऊ शकतात.

या आहेत कापसाच्या सर्वोत्तम 7 जाती ( Top cotton variety for farmers )

अंकुर नारायण बिजी II धरती सीड्स कंपनी

ज्यांनी अगोदर या वाणाची लागवड केली होती त्यांच्या अनुभवानुसार ज्या शेतकऱ्यांची जमीन कोरडवाहू आहे, त्यांच्यासाठी अंकुर नारायण बिजी II उत्तम ठरू शकते. या वाणाची खास विशेष अशी आहे, शेतकरी या जातीची लागवड तीन बाय दोन तीन बाई एक या अंतराच्या फरकाने करू शकतो.

नवनीत नुजीविडू सीड्स कंपनी

ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी आहे व जमीन कोरडवाहू आहे त्यांच्यासाठी चांगलं उत्पन्न देणारी जात म्हणून नवनीत या वाणाला ओळख मिळते. महाराष्ट्र मधील विदर्भ, मराठवाडा तसेच खानदेशातील काही भाग या ठिकाणी नवनीत या वाणाची जास्त लागवड करण्यात येते.

जर तुमच्या जमिनीला पाणी पुरत नसेल तर अशावेळी कमी पाण्यात येणारी नवनीत ही कापसाची जात तुम्ही लागवडीसाठी निवडू शकता.

सुपर कॉट प्रभात सीड्स कंपनी

महाराष्ट्रातील मोठा शेतकरी वर्ग आहे जो या वाणाची लागवड हमखास करतो. सुपर कॉट प्रभात ही प्रभात सीड्स कंपनीची सर्वाधिक उत्पन्न देणारी जात म्हणून ओळखल्या जाते. या वाणाची खास विशेषता म्हणजे कोरडवाहू जमिनीत सुद्धा चांगले भरघोस उत्पन्न मिळू शकते.

एनबीसी NBC 10

या वाणाची खासियत म्हणजे महाराष्ट्र राज्यातील वातावरण एनबीसी 10 या जातीसाठी खूप पूरक आहे. या वाणासाठी हवामान अनुकूल असल्यामुळे शेतकरी या वाणाला सुद्धा पसंती देताना दिसतात.

इतर वर बघितलेल्या जातींप्रमाणेच ही कापसाची जात सुद्धा कोरडवाहू जमिनीसाठी आणि कमी पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उत्तम ठरते.

अजित 5 बिजी II अजित सीड्स कंपनी

अजित सीड्स कंपनी खूप कालावधीपासून विविध कपाशीच्या वाणांवर संशोधन करत आहे. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या Cotton variety कंपनीच्या माध्यमातून शोधलेल्या आहेत.

अजित 5 बिजी II हे वाण कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी तसेच कमी आणि अधिक पाणी असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप चांगले उत्पन्न देणारे ठरते. योग्य रीतीने लागवड केल्यास शेतकऱ्यांना या वाणापासून चांगले भरघोस उत्पन्न प्राप्त होऊ शकते.

अजित 155 अजित सीड्स कंपनी

या वाणासाठी हलक्या प्रकारची जमीन असेल तरीसुद्धा चालते. पूर्व शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार हलक्या जमिनीत सुद्धा अजित 155 या वानाने चांगले भरघोस उत्पन्न दिलेले आहे. कोरडवाहू प्रकारच्या जमिनीमध्ये आणि बागायत जमिनीमध्ये दोन्हीकडे या वाणाचा चांगला प्रभाव दिसून येतो.

काही वेळा या वाणाला पाणी कमी पडले तरीसुद्धा तान सहन करण्याची क्षमता यामध्ये आहे. योग्य व्यवस्थापन असल्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न शेतकऱ्याला या वाणापासून मिळू शकते.

कबड्डी तुलसी सीड्स कंपनी

या वाणासाठी तुम्हाला कुठल्याही विशेष जमिनीची गरज नाही. कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये तुलसी सीड्स कंपनीचे कबड्डी हे वाण चांगले उत्पन्न प्राप्त करून देते. या वाणाला ठिबक सिंचन वर तसेच सरळ दांडाने पाणी सोडून सुद्धा लावता येते.

दोन्हीही प्रकारामध्ये या वाणापासून चांगला परतावा मिळतो. कबड्डी या वाणाला येणारे कापसाचे बोंड हे इतर बोंडांच्या तुलनेत मोठे असतात. कापूस वेचायला सुद्धा खूप सोपा असतो. फरदडी घ्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा हे वाण उत्तम समजले जाते.

Disclaimer – प्राप्त होणाऱ्या सामान्य माहितीच्या आधारावर वरील माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जमिनीचा प्रकार तसेच हवामान या आधारावरही कापूस वाणांची निवड केल्या जाते. तुम्ही तुमच्या कृषी सल्लागाराकडून कापूस लागवडीविषयी माहिती घेऊ शकता.

Leave a Comment