Monsoon Updates Maharashtra : केरळमध्ये मान्सूनचे आगमन, 10 जूनला महाराष्ट्र सुखावणार

राज्यभरातील शेतकऱ्यांना महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होईल याची हुरहुर लागलेली आहे. गतवर्षी मान्सून वेळेवर न आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षी मान्सून कडून शेतकऱ्यांना वेळेवर चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. असे असले तरी वेळेवर महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल किंवा नाही यासाठी शेतकरी चिंता व्यक्त करत आहे. आताच्या मान्सून अपडेट Monsoon Updates Maharashtra नुसार यावर्षी पाऊस ठरलेल्या वेळी येऊ शकतो.

यावर्षीचा उन्हाळा गेल्या काही वर्षांमधील सर्वात उग्र उन्हाळा म्हणून ओळखला जातोय. तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशाची राजधानी दिल्ली मध्ये तर तापमानाने एक नवा उच्चांक गाठला आहे.

मान्सून वेळेवर आल्यास तापमानाला मोठ्या प्रमाणात आळा बसेल अस सांगण्यात येत आहे. उत्तर पूर्व भारतामध्ये मान्सून दाखल झालेला आहे व महाराष्ट्रामध्ये पुढच्या दहा दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल अस हवामान विभागाने सांगितल आहे.

केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाने मान्सूनची सुरुवात

नेहमीप्रमाणे दरवर्षी 1 जुन ला मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो, मात्र यावर्षी हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे 31 जूनला केरळमध्ये मान्सून दाखल होईल हे भाकीत अगोदरच्या तारखेलाच खरे ठरले. 31 जूनला मान्सून दाखल न होता त्या अगोदरच 30 जूनला केरळमध्ये नैऋत्य मौसमी पावसाच्या सुरुवातीने मान्सून दाखल झालेला आहे. फक्त केरळमध्येच नाही तर ईशान्य भारतातील वेगवेगळ्या भागांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाने सुरुवात केली.

या दिवशी महाराष्ट्रात होईल मान्सून दाखल

महाराष्ट्र मधील सर्व शेतकऱ्यांसाठी मान्सून संबंधित आनंदाची बातमी आहे. मागच्या काही दिवसांपासून सर्व शेतकरी आकाशाकडे टक लावून वरून राजाची वाट बघत आहे. सरते शेवटी वरून राजाने मान्सूनच्या माध्यमातून चांगले सकारात्मक चिन्ह दाखवलेले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजा नुसार 10 जूनला महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होईल.

कोकण व मुंबईमधील उष्णता कायम राहू शकते

हवामान विभागाचा माहितीनुसार कोकणामधील सात जिल्ह्यात उष्णता पुढचे काही दिवस टिकून राहील. सध्या असलेले ढगाळ युक्त वातावरण 1 जून पर्यंत अधिक उष्णतेचे वातावरण तयार करेल. खानदेश आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. खानदेश भागामध्ये रात्रीच्या वेळी सुद्धा पुढील काही दिवस उकाडा जाणवू शकतो.

मान्सूनवर रेमल चक्रीवादळाचा परिणाम

केरळमध्ये सध्या दाखल झालेल्या मान्सूनचा प्रवास हा प्रथम कर्नाटकात व त्यानंतर महाराष्ट्रात असा होईल. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात मान्सून वेळेवर आल्यास उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळेल. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाणीटंचाई सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. पाण्यासाठी दूर भटकंती करून सुद्धा पाणी मिळत नाहीये. यामुळे सर्वच जण 10 जून ची वाट बघण्यात मग्न आहे.

हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून येण्याची तारीख वेगळी सांगितली होती, मात्र रेमल या चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवर झाल्यामुळे वेळेच्या आधी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. केरळ मध्ये ठीक ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पावसाला सुरुवात झालेली आहे. मान्सूनचे हे चक्र हळूहळू संपूर्ण देशामध्ये पोहोचेल असाही हवामान खात्याने नोंदवल.

कोणत्या राज्यात किती तारखेला पावसाच आगमन होईल

हवामान खात्याने मान्सून संबंधित पावसाचा वर्तवलेला अंदाज पुढील प्रमाणे आहे. तामिळनाडूमध्ये 1 जूनला पावसाच्या सरींना सुरुवात होईल. तेलंगणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये 10 जूनला मान्सूनचे आगमन होऊन जोरदार पावसाला सुरुवात होईल. तर मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, ओरिसा झारखंड, बिहार या राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन हे 15 जूनला होणार आहे.

जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेश मध्ये 25 जूनला पावसाचे आगमन होऊन जोरदार पाऊस बसेल. पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान या देशातील प्रचलित राज्यांमध्ये 30 जूनला पावसाला सुरुवात होईल. राजस्थान राज्यामध्ये काही प्रमाणात बदल होऊन ५ जुलैला सुद्धा पाऊस पडू शकतो.

Leave a Comment