Soyabean Farming : एकरी 20 क्विंटल उत्पन्न प्राप्त करून देउ शकणारे सोयाबीनचे 4 वाण

Soyabean Cultivation – आता जून महिन्याला सुरुवात झाली आहे. लवकरच महाराष्ट्रभर मोसमी पावसाचे आगमन होईल. हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार पुढच्या दोन दिवसांमध्ये म्हणजेच 4 जूनला सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सून पोचू शकतो. पुढे तळ कोकणामध्ये मान्सून दाखल होऊ शकतो व नंतर पुण्यामध्ये मान्सून दाखल होईल असही सांगितल जात आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सून वेळे आधीच दाखल झालेला आहे. वेळेआधी केव्हा मान्सून दाखल होईल हे नक्की सांगता येत नाही, तरी लवकरात लवकर मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे.

शेतकऱ्यांना मान्सूनची चाहूल लागताच शेतकरी सोयाबीन कपाशी मका या पिकांच्या लागवडीसाठी शेती मध्ये मशागत करायला सुरुवात करतात. शेतकऱ्यांचा सोयाबीन लागवडीकडे कल नेहमी वाढत आहे. जर तुम्ही देखील तुमच्या शेतामध्ये यावर्षी सोयाबीन लागवडीचा प्लॅन करत असाल व सोयाबीनचे कोणते वाण लागवडीसाठी निवडावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून नक्कीच मदत होईल.

या लेखाच्या माध्यमातून सोयाबीनच्या जास्त उत्पादन देणाऱ्या जातींपैकी 3 प्रमुख वाणांची माहिती आपण सविस्तर जाणून घेऊ. एकरी वीस क्विंटल पर्यंत सोयाबीनचे उत्पन्न घ्यायचे असेल तर या तिन्हीही सोयाबीनच्या जाती उत्कृष्ट ठरतात. या जातीच्या वाणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी एकरी वीस क्विंटल च्या जवळपास उत्पन्न घेतल्याचे सांगितले जात आहे. तर वेळ न घालवता जाणून घेऊया सोयाबीनच्या भरघोस उत्पन्न देणाऱ्या तीन मुख्य वाणांविषयी संपूर्ण माहिती.

फुले दूर्वा

फुले दूर्वा या सोयाबीनच्या वाणाची महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लागवड केल्या जाते. विविध जिल्ह्यांमध्ये लागवड करण्यात येणाऱ्या मुख्य सोयाबीन जातींपैकी हे एक मुख्य सोयाबीन वान आहे. महाराष्ट्र राज्यातील हवामान या वाणासाठी अत्यंत उपयुक्त समजले जाते. कृषी तज्ञांनी या वाणापासून 16 ते 17 क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न मिळवणे शक्य आहे, असे मत मांडले. चांगल्या भरगोस उत्पादनासाठी ओळखल्या जाणारी ही सोयाबीनची जात यावर्षीच्या पेरणीसाठी खूपच उपयुक्त ठरू शकते.

फुले कल्याणी 228

फुले कल्याणी 228 या जातीची लागवड सुद्धा उच्च प्रमाणात सोयाबीन पिकाचे उत्पन्न निघण्यासाठी केली जाते. या वाणाचा विशेष गुण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती या जातीची विलक्षण आहे, तसेच कीटकांना सुद्धा ही जात उत्तम प्रतिकार करते. रोगराई कमी असल्यामुळे या जातीच्या वाणापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पन्न मिळू शकते. तरी ढोबळमानाने पुणे कल्याणी 228 या जातीपासून एकरी 17 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पन्न प्राप्त होऊ शकते.

फुले संगम

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र यासोबतच उत्तर महाराष्ट्र मध्ये देखील फुले संगम या सोयाबीन वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जाते. सोयाबीन पिकाची ही एक सुधारित व प्रसिद्ध जात आहे. फुले संगम या वाणापासून शेतकऱ्यांना एकरी 15 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पन्न मिळू शकते असा दावा केला जातो. फुले संगम हे वाण जवळपास महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या परिचित आहे. सोयाबीन लागवडीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा फुले संगम या वाणाचे नाव काही मोजक्या मुख्य वाणांमध्ये हमखास येते.

एम ए यू एस 612

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत हे वान विकसित करण्यात आलेले आहे. 94 ते 98 दिवसांमध्ये हे वाण परिपक्व होऊन जाते. अतिशय चांगल्या उत्पादन देणाऱ्या वाणांपैकी हे एक वाण आहे. वातावरणाच्या अचानक बदलाला सामोरे जाणारे हे वाण असून पाण्याचा प्रवाह कमी पडल्यास सुद्धा तग धरून राहू शकते. या वाणाची उत्पन्न क्षमता ही हेक्टरी जवळपास 28 ते 32 क्विंटल पर्यंत आहे. दुष्काळ परिस्थितीमध्ये देखील चांगले उत्पन्न मिळू शकत असल्यामुळे शेतकरी या वानास प्राधान्य देताना दिसतात.

दिवसेंदिवस सोयाबीन वानांवर सातत्याने संशोधन होत आहे. एका क्षेत्रामध्ये एकाच जातीच्या बियाण्याची लागवड करण्यापेक्षा विविध जातीच्या बियाण्यांची लागवड करणे सोयीस्कर ठरते. हवामान बदलाच्या परिस्थितीमध्ये तसेच वेगवेगळ्या येणाऱ्या रोगराईंमध्ये विविध प्रकारचे बियाण तग धरून राहू शकतात अस तज्ञांच म्हणण आहे. शेतकरी सोयाबीन पिकांमधील अचानक होणाऱ्या नुकसान भरपाईच्या जाचाला समोर जाण्यापेक्षा हा उपक्रम करू शकतो.

Table of Contents

Leave a Comment